Ad will apear here
Next
ज्येष्ठ नागरिकांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा


पुणे : ‘श्री गणराय नर्तन करी’ हे भक्तीगीत, ‘बकेट लिस्ट’ हे नाट्य, कोळी गीतावरील नृत्य आणि जुन्या व नवीन हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर सादर केलेली नृत्ये, समवयस्क सवंगड्यांनी घातलेली साद अन् डोळ्यांसमोर तरळलेल्या तरूणपणीच्या आनंददायी आठवणी, अशा भावनिक आणि तितक्याच उत्साही वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी सोहळा अनुभवला. निमित्त होते अथश्री फाउंडेशनतर्फे आयोजित ‘आनंदघन २०१८’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.

कोथरूड येथील शकुंतला शेट्टी सभागृहात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे परिपूर्ण गृहसंकुल म्हणून ओळख असलेल्या ‘अथश्री’मध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अथश्री फाउंडेशनतर्फे ‘आनंदघन २०१८’ हे आठवे वार्षिक स्नेहससंमेलन आयोजित करण्यात आले. यामध्ये अथश्री बाणेर, बावधन, पाषाण, भुगावसह बडोदा आणि बंगळूरू येथील तब्बल १५० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी परांजपे स्किम्स (कन्स्ट्रक्शन्स) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, अथश्री फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सुदेश खटावकर आणि अथश्री पुणे, बंगळूरू, ब़डोदाचे अध्यक्ष व संचालक उपस्थित होते.

या संमेलनात एका व्यासपीठावर एकत्र आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यातील वैविध्यपूर्ण कलांचे सादरीकरण केले. ‘वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ’ या भक्ती गीताबरोबरच ‘कोणी पुरुष देता का पुरुष’ या नाट्य सादरीकरणातून आजी-आजोबांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. तसेच ‘काला चष्मा जचदा है’, ‘गल्ला गुडियाँ’ अशा हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्ये सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

आपल्या शारीरिक मर्यादा विसरून साज-श्रृगांर करून व्यासपीठावर अवतरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी नृत्य, गायन, नाटकाच्या सादरीकरणाद्वारे कार्यक्रमात मजा आणली. त्यांनी तरूणाईला लाजवेल इतक्या उत्साहीपणे विविध कला सादर करून स्नेहसंमेलनातील वातावरण भारावून टाकले. त्यांच्या सादरीकरणांना उपस्थितांची ‘वन्स मोअर’सह टाळ्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. या स्नेहसंमेलनाचे यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात आले. ते विविध राज्यात पाहिले गेले. नितीन अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZRKBN
Similar Posts
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये
माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन पुणे : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक माधव गडकरी यांच्याविषयी समग्र माहिती देणारे, www.madhavgadkari.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, नुकतेच या संकेतस्थळाचे उद्घाटन कुंदाताई गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language